•   Thursday, October 30
कोकण

Railway: पावसाळ्यासाठी कोकण रेल्वेकडून विशेष अभियान

यंदाचा पाऊस मुसळधार असणार आहे. या मुसळधार पावसाकडे लक्ष देत पावसाळ्यासाठी कोकण रेल्वेकडून विशेष अभियान राबविण्यात येणार आहे.कोकण रेल्वेने पावसाळ्यात अनुचित घटना टाळण्यासाठी 673 प्रशिक्षित रेल्वे कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. पावसामुळे कोकण रेल्वेवर कोणत्याही प्रकारचा परिणाम होऊ नये, यासाठी कोकण रेल्वेकडून कामांचे नियोजन करण्यात आले आहे. मुसळधार पावसात लोको पायलटने सुरक्षित वेगाने गाडी चालवावी, अशा सूचना त्यांना देण्यात आलेल्या आहेत. रेल्वे वाहतुकीवरील परिणाम टाळण्यासाठी कोकण रेल्वेकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.


घाटात अतिमुसळधार पावसामुळे दृष्यमानता खालावून होणारे अपघात होऊ नये, याकरिता 40 किमी प्रतितास या सुरक्षित वेगाने गाड्या चालवण्याच्या सूचना सर्व लोको पायलटला कोकण रेल्वे विभागाकडून देण्यात आलेल्या आहेत. रेल्वे वाहतुकीच्या सुरक्षा विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नियंत्रण कक्ष आणि स्थानकांशी संपर्क ठेवण्यासाठी मोबाइल फोन देण्यात आले आहेत.


मेल-एक्स्प्रेसच्या लोको पायलटला आणि गार्डला वॉकी-टॉकी देण्यात आलेले आहेत. ज्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधता येईल. आपत्कालीन स्थितीत माहिती पुरवण्यासाठी एक किलोमीटर अंतरावर आपत्कालीन संवाद केंद्र (ईएमसी) स्थापित करण्यात आले आहेत. सर्व मुख्य सिग्नल एलईडीमध्ये रूपांतर करण्याचे काम पूर्ण झाल्याने धुक्यांमध्ये सिग्नल अधिक चांगले दिसतील, अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आलेली आहे.