सर्व मुलांची वागणूक वेगळी असते. मुलांसाठी रागावणे, वाईट वाटणे, विचित्र वागणे हे सामान्य आहे, परंतु जेव्हा हे दुःख आणि राग आठवडे किंवा त्याहून अधिक काळ टिकतो, तेव्हा ही चिंताजनक गोष्ट असू शकते. जर मुलाला रागाने चिडचिड होत असेल आणि त्याचे वागणे बदलत असेल तर ते नैराश्य असू शकते. पालकांनी त्यांच्या मुलांच्या अशा लक्षणांकडे कधीही दुर्लक्ष करू नये. 'लो मूड' म्हणजेच कमजोर मनःस्थिती आणि नैराश्य या अशा समस्या आहेत, ज्याचा मुलांनाही सामना करावा लागतो. या मुलांच्या नैराश्याचे कारण केवळ करिअर आणि घरातील ताणतणाव नसतात. त्यापेक्षा भावनिक सुरक्षिततेचा अभाव, पालकांकडून योग्य लक्ष न मिळणे किंवा शोषण अशी इतरही अनेक कारणे आहेत जी मुलांमध्ये नराश्याचे कारण बनतात.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, 'डिप्रेशन इन चिल्ड्रन अँड एडोलेसेंट्स: अ रिव्ह्यू ऑफ इंडियन स्टडीज' या अहवालानुसार, प्रत्येक 7 पैकी एका भारतीय मुलाला मोटिवेशनचा अभाव, लो मूड आणि नैराश्याच्या सुरुवातीच्या लक्षणांनी ग्रासले आहे आहे. सर्वात वाईट गोष्ट अशी की, सुमारे 97 टक्के प्रकरणांमध्ये पालक याकडे लक्ष देत नाहीत, ज्यामुळे मुलाच्या व्यक्तिमत्त्वावर, वागणुकीवर आणि मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. आपल्या देशातील एकूण लोकसंख्येपैकी 6 टक्के मुले आहेत. यापैकी, 13 ते 15 वर्षे वयोगटातील प्रत्येक 4 मुलांपैकी एक मूल तणावपूर्ण मनःस्थितीतून जात आहे. हे असे वय असते जेव्हा मूल जग, नातेसंबंध, समाज, स्वतःचे-परके, बरोबर-अयोग्य अशा गोष्टी शिकत असते. अशा परिस्थितीत नैराश्यामुळे त्याला योग्य मार्ग मिळाला नाही तर तो भरकटत जाऊ शकतो.
मुलांमधील नैराश्याची लक्षणे :-
निद्रानाश किंवा जास्त झोप येणे, आत्मविश्वासाचा अभाव, काही चांगले घडले तरी आनंद वाटत नाही, रागाने वस्तू फेकणे, मोठ्याने ओरडणे, कुटुंब आणि मित्रांपासून दूर राहणे, स्वतःला इजा करणे, आत्महत्येचे विचार येणे किंवा त्याबद्दल बोलणे
मुलांना नैराश्यापासून कसे वाचवाल?
मुलांशी प्रेमाने वागा, प्रत्येक प्रसंगात तुम्ही त्याच्यासोबत आहात याची जाणीव मुलाला द्या, त्यांना वेळ द्या, त्याच्याशी बोला, खेळ खेळा किंवा त्याला एकत्र फिरायला घेऊन जा, तुमच्या मुलाच्या शिक्षकांना भेटा, त्याच्याबाबत फीडबॅक मिळवा, मुलाला चुकीची शिक्षा दिल्यानंतर आणि शिक्षा संपल्यानंतर त्याच्याशी प्रेमाने वागा, जेव्हा मूल भावनिकदृष्ट्या कठीण परिस्थितीतून जात असेल तेव्हा त्याला धीर द्या आणि त्याला प्रेरणादायी गोष्टी सांगा.