•   Thursday, August 28
लाईफस्टाईल

घरात पाहुणे आलेत,चिंता नको अशी करा त्यांच्यासाठी झटपट तांदळाची खीर

शाळेत जाणाऱ्या चिमुकल्यांना उन्हाळ्याच्या सुट्टी लागल्या आहेत. त्यामुळे बच्चे कंपनी आपल्या मित्रांबरोबर खेळ खेळण्यात मश्गुल झाले आहेत. अशात जर ही बच्चे कंपनी घरी आली तर त्यांच्यासाठी पौष्टिक आणि चविष्ट अशी गोड डिश बनवून द्या. ती म्हणजे ‘तांदळाची खीर’


तांदळाची खीर हे देशातील लोकप्रिय मिष्टान्न आहे. तांदूळ, सुकामेवा आणि केसर घालून हा गोड पदार्थ तयार केला जातो. चला तर जाऊन घेऊया त्याला लागणारे साहित्य आणि कृती.. 


साहित्य :


१ लिटर ्रकीम दूध, 

१00 ग्रॅम साखर,

१ वाटी तांदूळ, 

१ मोठा चमचा तूप,

१ छोटा चमचा जायफळ-वेलची पूड,

केशर,

काजू, बदामाचे काप.


कृती


एका बाउलमध्ये तांदूळ पाण्यात १० ते १५ मिनिटांसाठी भिजत ठेवा. त्यानंतर ते थोडावेळ उपसून ठेवा. नंतर मिक्सरमध्ये वाटून घ्या. तांदूळ जाडसर स्वरुपात वाटायचे आहेत. एका पॅनमध्ये तूप घालून त्यावर वाटलेले जाडसर तांदूळ गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्या. पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाणी उकळल्यानंतर त्यात एक लिटर दूध ओता. दूध उकळल्यानंतर त्यात केसर मिक्स करा. दूध सतत ढवळत राहा. जेणे करून ते पॅनला चिकटणार नाही. पाच मिनिटांसाठी दूध उकळू द्या. केसर मिक्स करा. यानंतर भाजलेले तांदूळ दुधामध्ये मिक्स करा. पॅनमधील सामग्री ढवळत राहा. तांदूळ चांगल्या पद्धतीने शिजू द्यावे. दूध घट्ट झाल्यानंतर त्यात साखर मिक्स करा. आता खीरमध्ये काजू-बदाम आणि चवीनुसार जायफळ-वेलची पावडर मिक्स करा. दोन ते तीन मिनिटांसाठी खीर शिजू द्या. खीर तयार झाल्यानंतर गॅस बंद करा. आपली चविष्ट अशी तांदळाची खीर तयार झाली आहे...