उन्हाळी सुट्ट्यांमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित होत असतात. त्यानिमित्त नातेवाईक आणि मित्रमंडळी एकत्र येतात. अशा वेळी मुलांच्या हट्टीपणामुळे रंगाचा बेरंग होऊ शकतो. हे टाळण्यासाठी मुलांना काही एटिकेट्स शिकवणे गरजेचे असते.
घरात पाहुण्यांचे स्वागत योग्यप्रकारे कसे करायचे हे मुलांना शिकवावे. प्रत्येकाशी हसून बोलण्याचे धडे द्यावेत.
पाहुण्यांनी दिलेल्या भेटवस्तूचा हसतमुखाने स्वीकार करणे आणि धन्यवाद देणे त्यांना शिकवावे.
पाहुण्यांनी आणलेल्या भेटवस्तूंबाबत लगेचच कोणतीही प्रतिक्रिया देऊ नये, भेटवस्तू आवडली नसल्यास नाराजी व्यक्त करू नये, हे त्यांना समजावून सांगावे.
पार्टीसाठी पाहुने म्हणून गेल्यानंतर कसे वागावे याचेही धडे त्यांना द्यावेत.
गिफ्ट देण्यासाठी मुलांना पुढाकार घेऊ द्यावा. यातूनच संवाद सुरू होतो.
मुले लवकर बोअर झाल्यास त्यांचे मन रमवण्याचा प्रयत्न करावा. कोणतेही सामान वापरण्यापूर्वी यजमानांची अनुमती घ्यायला मुलांना शिकवावे.
निघताना यजमानांचा निरोप घेण्यास त्यांना शिकवावे. मोठय़ांना अभिवादन करण्यास सांगितले जावे.