•   Thursday, August 28
मराठवाडा

ब्रेकिंग : सामाजिक न्याय मंत्र्यांना कोरोनाची लागण

बीड : कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाचा फटका सरकारमधील मंत्री आणि मंत्रालयाला देखील बसला आहे. आता महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यांच्यासह त्यांच्या पाच कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.  यात त्यांचे दोन स्वीय सहाय्यक, मुंबईतील वाहन चालक, स्वयंपाकी, बीडचा वाहन चालक यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे 'त्या' मंत्र्यासह कोणत्याही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लक्षणं नाहीत.  काल रात्री त्यांच्या कोरोना टेस्टचे अहवाल आले.
याआधी महाविकासआघाडी सरकारमधील मंत्री अशोक चव्हाण आणि जितेंद्र आव्हाड यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. ते दोघेही बरे झाले आहेत. तसंच मंत्रालयातील काही सचिवांसह काही अधिकाऱ्यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. यातील अनेकजण कोरोनावर मात करुन घरी परतलेत. आता सामाजिक न्याय मंत्री यांना कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे या मंत्र्याने 8 जून रोजी बीड जिल्ह्यातील पहिल्या कोरोना विषाणू थ्रोट स्वॅब तपासणी प्रयोगशाळेचे लोकार्पण देखील केले होते.

बातमीतील ठळक मुद्दे

Social Justice Beed Mumbai Mantralaya Maharashtra Corona COVID19