•   Thursday, August 28
मराठवाडा

पंकजाताई मुंडे यांनी स्वहस्ते रेखाटले प्रभू रामचंद्रांचे चित्र !

बीड : मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांची जन्मभूमी असलेल्या अयोध्या येथे आज  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीराम यांच्या भव्यदिव्य मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक जण या ऐतिहासिक आनंदी क्षणात श्रद्धेने सहभागी होत आहेत. माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी अनोख्या पद्धतीने आपली श्रद्धा प्रकट केली आहे. उपजतच चित्रकलेची आवड जोपासत त्यांनी प्रभु श्रीरामाचे स्वहस्ते सश्रद्ध  चित्र साकारत त्यांना कलात्मक नमन केले आहे.

अयोध्येत प्रभू श्रीराम यांचे भव्यदिव्य मंदिर असावे ही आस्था आज प्रत्यक्षात साकारली जात आहे. अनेक वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर समस्त देशवासीयांचे स्वप्न या ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्ताने पूर्ण होत आहे. राम मंदिर भूमिपूजनाच्या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त सर्वांना  शुभेच्छा व्यक्त करतांना पंकजाताई मुंडे यांनी अनोख्या पद्धतीने आपली श्रद्धा प्रकट केली आहे. नेहमीच काही तरी विशेष व अनोखी संकल्पना मांडणाऱ्या पंकजाताई यांनी कोरोनामुळे निर्माण झालेल्या लॉकडाऊन परिस्थितीत आपला चित्रकलेचा व्यासंग विकसित केला आहे. यापुर्वीही त्यांनी रेखाटन केलेल्या चित्रावरुन मोठी चर्चा घडली होती.श्रीराम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार्श्वभुमीवर पंकजाताईंच्या भावविश्वातील प्रभु श्रीरामाचे सुरेख व विलोभनीय चित्र साकारले आहे.या माध्यमातून भुमीपुजन सोहळ्याला त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या असून या चित्राखाली त्यांनी “Trying to put my trust through brush to bow down to the maryada purushottam “shree ram”.. big day today ..” असे लिहीत मर्यादापुरुषोत्तम प्रभु श्रीराम चरणी नमन केले आहे.

बातमीतील ठळक मुद्दे

Pankaja Munde Lord Ramchandra