•   Thursday, October 30
देश

डीआरडीओ मध्ये बंपर पदभरती

नौदल विज्ञान आणि तांत्रिक प्रयोगशाळा, विशाखापट्टणम, डीआरडीओ ची एक प्रमुख प्रयोगशाळा आहे. त्यांनी आपल्या अधिकृत वेबसाइटवर 62 पदवीधर / डिप्लोमा/ आयटीआय अप्रेंटिस पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. 27 जून 2023 अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख आहे.


या पदांसाठी भरती

ग्रेजुएट अप्रेंटिस-28

डिप्लोमा अप्रेंटिस-13

ट्रेड अप्रेंटिस -11

 

वयोमर्यादा

उमेदवारांचे वय अर्ज करण्याच्या तारखेस 18 वर्षापेक्षा कमी नसावे.


शैक्षणिक पात्रता

या पदांसाठी शैक्षणिक पात्रतेसाठी अधिकृत अधिसूचना तपासावी.


वेतनमान

ग्रेजुएट अप्रेंटिस – 9000 रुपये प्रति माह

डिप्लोमा अप्रेंटिस- 8000 रुपये प्रति माह

ट्रेड अप्रेंटिस – सरकारने ठरवून दिलेला दर


या पदांसाठी निवड प्रक्रिया कागदपत्र पडताळणीवर आधारित असेल. आवश्यकतेनुसार शैक्षणिक गुणवत्ता / कौशल्य चाचणी यांचाही समावेश यात आहे. लेखी परीक्षा/ मुलाखतीच्या आधारे निवड केली जाईल. एनएसटीएल, विशाखापट्टणम येथे रुजू होताना उमेदवारांना ऑनलाइन सादर केलेली कागदपत्रे आणायची आहेत.

बी.ई/ बी.टेक/ डिप्लोमा अर्जदारांनी www.mhrdnats.gov.in आणि आयटीआय उमेदवारांनी www.apprenticeshipindia.gov.in या अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करावी.