•   Thursday, August 28
देश

बिपरजॉय चक्रीवादळाचे सॅटेलाईट फोटो जारी

बिपरजॉय चक्रीवादळ आज गुजरातच्या कच्छ किनारपट्टीवर धडकले. त्याचा गंभीर परिणाम दिसून आला आहे. समुद्रात वादळी लाटा उसळल्या, तर वेगवान वाऱ्यांमुळे वृक्षही उन्मळून पडले.


दरम्यान, अंतराळातून बिपरजॉयची धडकी भरवणारी छायाचित्रे समोर आली आहेत. यूएईचे अंतराळवीर सुलतान अल नेयादी यांनी हे फोटो इंटरनॅशनल स्पेस स्टेशन वरून जारी केले आहेत.


सुलतान अल नेयादी यांनी टिपलेल्या या दृश्यांमध्ये अरबी समुद्रावर चक्रीवादळ दिसत आहे. जे अतिशय भीषण रूप धारण करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये उंच लाटा उसळताना दिसत आहेत. याआधीही नेयादी यांनी आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ ट्विट केला होता.




हा व्हिडिओही त्यांनी आयएसएसवरून शूट केला आहे. त्यांनी या व्हिडिओमधून वादळाचे दृश्य दाखवले आणि सर्व लोकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले. "आयएसएस अनेक नैसर्गिक घटनांवर एक अद्वितीय दृष्टिकोन प्रदान करते, जे हवामानाचे निरीक्षण करणार्‍या शास्त्रज्ञांना खूप मदत करू शकते," त्यांनी लिहिले.




गुरुवारी रात्री उशिरा आलेल्या अपडेटनुसार बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीवर धडकले आहे. वादळ सौराष्ट्र आणि कच्छच्या किनारपट्टीवर धडकल्याने वाऱ्याचा वेग ताशी 125 किमी झाला आहे. रात्री 8 ते 10 दरम्यान भूकंपाची संपूर्ण तीव्रता असण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. यादरम्यान वाऱ्याचा वेग 150 किमी प्रतितास पर्यंत पोहोचू शकतो. भुजमध्ये 5 इंचापर्यंत पाऊस झाला आहे. द्वारका आणि भुजमध्ये वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे.