- काँग्रेसला मत म्हणजे अराजकता निर्माण करणे
कर्नाटक सरकारने धर्मांतर बंदी कायदा रद्द व स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अभ्यासक्रमातील धडा काढून टाकला आहे तर लवकरच गोहत्या बंदी कायदा रद्द केला जाणार आहे, यावर आता उद्धव ठाकरे यांनी लंडनमधूनच आजच भूमिका स्पष्ट करावी की त्यांना कर्नाटक मध्ये झालेल्या प्रकार मान्य आहे का?, असे प्रश्न भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
ते नागपूर येथे ते माध्यमांशी बोलत होते. चंद्रशेखर बावनकुळे यांनी आताही उद्धव ठाकरे भविष्यातही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणार आहेत का? हे त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला सांगावे, असा प्रश्न केला. कॉंग्रेसला दिलेले मत आपल्या संस्कृतीकरिता किती वाईट आहे.राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेत वीर सावरकरांचा अपमान केला होता, असे सांगून ते म्हणाले काँग्रेसला दिलेला एक मत म्हणजे किती मोठी चूक आहे, याचे कर्नाटक हे उदाहरण आहे, कॉंग्रेसला मत हे अराजकता निर्माण करणारे आहे तर एक कमळाचे मत भारताला जगातील सर्वोत्तम देश व्हावा यासाठी आहे, असेही ते म्हणाले.
माजी आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी ओबीसी विरोधी असलेले राहुल गांधीवर टीका केली. यावरून नाना पटोले यांनी त्यांना पक्षातून काढून टाकले. काँग्रेसमध्ये ओबीसींची बाजू मांडणे चुकीचे असेलही. पण भाजपमध्ये ओबीसींचा सन्मान आहे. आशिष देशमुख यांनी मला लोकसभा, विधानसभा निवडणूक लढायची नाही. तर मला भाजपमध्ये संघटनात्मक काम करायचे आहे. काँग्रेस ओबीसी विरोधी असल्याने मला आता त्यांच्यासोबत राहायचे नाही, असे देशमुख यांनी सांगितल्याचा दावा श्री बावनकुळे यांनी केला.
अजित पवार हे विरोधी पक्ष नेते आहेत, त्यामुळे ते काहीतरी बोलत आहेत. पैसापासून सत्ता आणि सत्तेपासून पैसा असा त्यांचा इतिहास आहे. त्याच्यावरचे उत्तर योग्य वेळी देऊ. दीपक केसरकर यांनी अजित पवारांबद्दल काय म्हणाले त्याचे उत्तर त्यांनी स्वत: देणे योग्य ठरेल, असेही श्री बावनकुळे म्हणाले.
• तेलंगणा मधील बीआरएसच्या मॉडेल मध्ये किती चुका आहेत. त्याची एक चित्रफित आम्ही लवकरच सर्वांसमोर आणणार आहोत.
• अंबादास दानवेंनी मविआच्या सरकारच्या काळात प्रकरणांची यादी करून सरकारला द्यावी सरकार चौकशी करेल.
• देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे प्रगल्भ नेते असून त्यांना महाराष्ट्राचा हित कळते. त्यामुळे ते लहान सहान गोष्टीला थारा देणार नाही.
• केंद्रीय नेतृत्व कधीही कोणाची उंची जास्त किंवा कमी करत नाही.. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला औकात नसताना राज्याचे अध्यक्षपद दिले
• देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील क्रमांक एकचे नेते आहे. हे 2014 आणि 2019 मध्ये सिद्ध झाले आहे.
• उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी जे विधान केले आहे ते त्यांचे व्यक्तिगत विधान आहे. उद्धव ठाकरे साठी आता आमचे दार बंद आहे. आम्ही त्यांच्याशी कुठलीही चर्चा करणार नाही.