•   Thursday, August 28
तंत्रज्ञान

क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; डिस्नी+हॉटस्टारवर फ्री बघता येईल विश्वचषक, आशिया कप

लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्नी+हॉटस्टार भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आला आहे. क्रिकेट चाहत्यांना आता डिस्नी+हॉटस्टारवर  क्रिकेट विश्वचषक, येणारे आशिया कप चषक मोफत बघता येणार आहे. आगामी आशिया कप आणि वर्षा अखेरी होऊ घातलेल्या आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक यासंदर्भात डिस्नी+ हॉटस्टार शुक्रवारी हे जाहीर केले आहे. याचा फायदा मोबाईलवर क्रिकेट स्पर्धा बघणाऱ्या चाहत्यांना होणार आहे. 


भारतात मोबाईलवर क्रिकेट स्पर्धा बघणाऱ्यांची अधिक आहे, याचाच फायदा घेत JioCinema ने नुकतेच झालेले Tata IPL 2023 टूर्नामेंट सर्व वापरकर्त्यांना मोफत स्ट्रीमिंग ऑफर केली होती. त्याचे अनुकरण करीत डिस्नी+ हॉटस्टारने  त्यांच्या वापरकर्त्यांसाठी ही खास ऑफर आणली आहे. याकरिता वापरकत्यांकडून कुठलाही शुल्क आकारल्या जाणार नसल्याचे सांगितल्या जात आहे. 

Disney+ Hotstar ची मोफत स्ट्रीमिंग का ?

Tata IPL 2023 टूर्नामेंटच्यावेळी JioCinema चे IPLचे सामने त्यांच्या प्लॅटफॉर्मवर निःशुल्क दाखवीत  प्रचंड यश संपादित केले. या निर्णयामुळे JioCinema च्या युजर्सची संख्या वाढली होती. त्यामुळे आता   Disney+ Hotstar ने देखील आपल्या वापरकर्त्यांची संख्या वाढविण्यासाठी हा निर्णय घेतला असावा असे मत तज्ज्ञ मंडळींनी व्यक्त केले आहे.