•   Thursday, August 28
वाणिज्य

बँकांमधील बेनामी रक्कम कोणाची? देभरातील बँकांमध्ये ३५ हजार कोटींहून रक्कम बेनामी

दिल्ली. देशातील अनेक बँकांमध्ये असलेल्या रक्कमांना कुणी वारसच नसल्याने आता ही बेनामी रक्कम कोणाची? असा प्रश्न उपस्थित राहतो आहे. देशभरातील बँकांमध्ये सुमारे ३५ हजार कोटी रुपये बेनामी असल्याची माहिती आहे.


पूर्वी अनेक लोक बँकेत खाते उघडत होते. पण त्याचा थांगपत्ता कधीच घरच्यांना लागत नव्हता. घरच्यांपासून लपून ही खाते उघडण्यात येत होती. अडीअडचणीच्या वेळी रक्कम हाती असावी यासाठी घरातील सदस्य हा खटाटोप करत असत. आता त्यांच्यानंतर या खात्यावर आणि त्यावरील पैशांवर तुम्हाला हक्क सांगता येईल. त्यांनी योग्य कागदपत्रे आणि पुरावे सादर केले तर ही रक्कम त्यांना मिळू शकते.


भारतीय बँकांमध्ये अनेक खातेदारांचे पैसे पडून आहेत. खाते उघडल्यानंतर या खात्यात त्यांनी रक्कम जमा केली होती. काहींनी मुदत ठेव ठेवली. याविषयीची माहिती त्यांनी कुटुंबियांना दिली नाही. खातेदार जग सोडून गेल्यानंतर ही रक्कम तशीच पडून आहे. देशातील अनेक बँकांमध्ये जवळपास 35,012 कोटी रुपये पडून आहेत. मार्च 2022 मध्ये ही रक्कम 48,262 रुपये होती.


आता यापुढे ज्या खातेदारांनी खाते उघडले, मुदत ठेवमध्ये गुंतवणूक केली. त्यांची रक्कम पुढे अनक्लेम डिपॉझिटमध्ये जाऊ नये यासाठी केंद्रीय बँकेने पाऊल टाकले आहे. त्यासाठी एक प्रणाली विकसीत करण्यात येत आहे. ही प्रणाली कृत्रिम बुद्धीमतेवर काम करेल. त्यासाठी एक वेब पोर्टल तयार करण्यात येत आहे. त्यामुळे ज्या रक्कमेवर दावा सांगण्यात आलेला नाही, त्याविषयीची योग्य माहिती समोर येईल. तसेच सध्या जी हजारो कोट्यवधींची रक्कम पडून आहे, तिच्या वारसदारांचा शोध लावता येईल.बँकांमधील बेनामी रक्कम कोणाची?