•   Thursday, August 28
वाणिज्य

महिलांना भरघोष व्याजदर देणारी योजना

महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. जर एखाद्या महिलेला पैसे वाचवायचे असतील तर ही बातमी तिच्यासाठी खूप महत्त्वाची ठरेल. महिला सन्मान बचत पत्र योजना या आर्थिक वर्षात संपूर्ण भारतातील टपाल विभागाने नुकतीच सुरू केली आहे. ही योजना 1 एप्रिलपासून सुरू झाली असून ती दोन वर्षे सुरू राहणार आहे.

 

महिलांच्या आर्थिक समावेशन आणि सक्षमीकरणासाठी ही योजना टपाल विभागाने सुरू केली आहे. ज्याचा आकर्षक आणि उच्च व्याजदर 7.5 टक्के आहे. योजनेतील किमान रक्कम रु. 1000/- आणि कमाल मर्यादा रक्कम रु. 200000/- पर्यंत महिला सन्मान बचत प्रमाणपत्रे घेता येतील. यासोबतच खात्याचा मॅच्युरिटी कालावधी 2 वर्षांचा आहे. यामध्ये महिला व मुलींकडूनही मोठी उत्सुकता दिसून येत आहे. याचे कारण म्हणजे येथे त्यांना त्यांच्या बचतीवर चांगले व्याज मिळत आहे.

या योजनेंतर्गत महिला आणि मुली विशेष परिस्थितीत त्यांचे खाते मुदतीपूर्वी बंद करू शकतात. खाते उघडण्यासाठी खाते उघडण्याचा फॉर्म, आधार आणि पॅन कार्ड, जमा रकमेसह धनादेश जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जमा करता येईल. या योजनेची सुविधा प्रत्येक जिल्ह्यातील सर्व गावे व तहसीलमधील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहे. ही योजना महिला व मुलींसाठी उपलब्ध आहे. महिला तिच्या जवळच्या कोणत्याही पोस्ट ऑफिसमधून यासंबंधी माहिती मिळवू शकते