वर्ष 2012 साली रिलीज झालेला अक्षय कुमार आणि परेश रावल स्टारर 'ओह माय गॉड' सिनेमा हा खूप हिट ठरला. आता, ओह माय गॉडच्या यशानंतर तब्बल 11 वर्षांनंतर, अक्षय कुमार सोशल कॉमेडी ओह माय गॉड 2 घेऊन परतला आहे.
पहिल्या भागात अक्षय कुमार भगवान कृष्णाच्या भूमिकेत दाखवण्यात आला होता, तर 'ओह माय गॉड 2'मध्ये अक्षय भगवान शिवाच्या भूमिकेत दिसणार आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाच्या पोस्टरने चाहत्यांना भुरळ घातली आहे.
https://twitter.com/akshaykumar/status/1667011134224756738?t=NsSroZcVe-ZuFMTZnwtEgw&s=19
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेता टायगर श्रॉफ दिसणार आहे. तर, दुसरीकडे चाहते अक्षय कुमारच्या आगामी ‘ओएमजी २’ या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचा पहिला भाग चाहत्यांना खूप आवडला होता. आता ‘ओएमजी २’ बद्दल नवीन अपडेट समोर आली आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाची रिलीज डेट काहीर केली आहे. तर, या निमित्ताने अक्षय कुमारचा नवा अवतार देखील पाहायला मिळाला आहे.
अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘ओएमजी २’ची रिलीज डेट जाहीर झाली आहे. हा चित्रपट ११ ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. अक्षय कुमारचा चित्रपट सनी देओलच्या ‘गदर २’ला टक्कर देण्यासाठी सज्ज झाला आहे. यापूर्वी अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले गेले होते की, निर्माते चित्रपट थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा विचार करत आहेत. मात्र, आता बॉलिवूडच्या खिलाडीने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर ‘ओएमजी २’चे पोस्टर आणि रिलीज डेट जाहीर केली आहे.
अभिनेता अक्षय कुमारने स्वतः त्याच्या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये त्याच्या अंगावर राख फासलेली आहे. त्याचे लांब केस आहेत. तो खाली बघतोय आणि एका हाताने डमरू वाजवतोय. एकंदरीत या पोस्टरवर अक्षय कुमारचं अघोरी रूप पाहायला मिळालं आहे. अक्षय कुमारचा ‘ओएमजी २’ हा चित्रपट ११ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, आता या चित्रपटाच्या पोस्टरवरून नवा वाद उफाळून येण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. यात अक्षय कुमारचं अघोरी रूप वादाला कारणीभूत ठरू शकतो.