दिशा पटाणी एक प्रसिद्ध भारतीय मॉडेल आणि बॉलिवूड अभिनेत्री आहे. तेलुगू चित्रपट 'लोफर' मधून पदार्पण करण्यापूर्वी, ती मॉडेलिंग जगतातील एक प्रसिद्ध चेहरा होती.बॉलीवूड चित्रपट "एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी" मधील 'प्रियांका झा' च्या भूमिकेसाठी दिशा पटाणी प्रसिद्ध आहे. बॉलिवूड मधील लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक असलेल्या दिशाचं शिक्षण माहिती आहे का..?दिशा पटाणीला खरंतर एयरफोर्स पायलट व्हायचे होते पण तिने मॉडेलिंग पासून सुरुवात केली, आणि आज दिशा प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. दिशा पटाणीचा जन्म 13 जून 1992 रोजी बरेली (उत्तर प्रदेश) येथे झाला. तिच्या वडिलांचे नाव जगदीश सिंग पटाणी असून ते पोलीस अधिकारी आहेत. दिशा राजपूत कुटुंबातील आहे. दिशा पटाणीचे कुटुंब मूळचे उत्तराखंडमधील टनकपूर येथील अंबागचे आहे. वडिलांच्या नोकरीमुळे कुटुंबाला बरेली येथे स्थलांतरित व्हावे लागले.
शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर दिशा, लखनऊच्या एमिटी युनिव्हर्सिटीमध्ये कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनीअरिंगची पदवी घेण्यासाठी दाखल झाली.जेव्हा ती नोएडामधून बी.टेक करत होती, तेव्हा तिला काही मॉडेलिंग प्रोजेक्ट्स मिळाले आणि म्हणून तिने तिचे शिक्षण अर्धवट सोडले. तिने त्यावेळी हिरोपंतीसाठी ऑडिशनही दिले होते पण ती नाकारण्यात आली होती.दिशाने एमिटी विद्यापीठामध्ये पदवीचे शिक्षण घेत असताना एक मॉडेलिंग स्पर्धेत सहभाग घेतला होता. ज्यामध्ये ती विजयी ठरली होती. त्यानंतर दिशाने अनेक मॉडेलिंगच्य स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता.दिशाने फेमिना मिस इंडिया स्पर्धेत सहभाग घेतला होता. यात दिशा पहिली रनरअप ठरली होती. मॉडेलिंग करत असतानाच दिशाने पूर्णवेळ याच क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला होता.दिशाने यानंतर 2016 मध्ये 'एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये दणक्यात पदार्पण केले.दिशा पटाणीने यानंतर सलमानसोबत भारत चित्रपटात एक आयटम सॉंग आणि बाघी 3 मध्ये ही एका आयटम नंबरमध्ये काम केले आहे. दिशाने बाघी 2, मलंग, राधे आदी सिनेमांमध्ये विविध भूमिका साकारुन चाहत्यांचे मन जिंकून घेतले आहे.