•   Thursday, August 28
कोकण

कोंकण विभागीय आयुक्त पदी अण्णासाहेब मिसाळ

नवी मुंबई : महाराष्ट्र शासनाने आज काढलेल्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदलीच्या आदेशात कोंकण विभागाच्या विभागीय आयुक्त पदावर अण्णासाहेब मिसाळ यांची बदली करण्यात आली आहे.  
    अण्णासाहेब मिसाळ यांनी कोंकण विभागीय आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकरला आहे.  मिसाळ हे यापूर्वी नवीमुंबई महानगरपालिका आयुक्त म्हणून कार्यरत होते.  अण्णासाहेब मिसाळ यांचा जन्‍म 13 जून 1961 साली झाला असून त्यांनी मराठवाडा विद्यापीठातून बीएससी (ॲग्रीकल्चर) व एमएसी (ॲग्रीकल्चर) केले आहे. मिसाळ यांनी हेगच्या इन्टिट्यूट ऑफ सोशल स्टडीज कडून डेव्हलपमेंट स्टडीजची पदवी प्राप्त केली आहे.  2004 सालच्या भाप्रसे बॅचमधून अधिकारी झाल्यानंतर उप आयुक्त (महसूल) कोकण विभाग या पदाचा कार्यभार त्यांनी सांभाळला. 2014 ते 2016 या कालावधीत त्यांनी जिल्हाधिकारी धुळे या पदावर उत्कृष्ट काम केले. मुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ या पदावर ते 2016 ते 2019 या कालावधीत  ते कार्यरत होते. 
बुधवारी मिसाळ यांनी विभागीय आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर कोकण विभागात पर्यटन, पर्यावरण,फलोत्पादन, आणि मत्स्यव्यवसाय याकडे भर असेल असे त्यानी सांगितले .

बातमीतील ठळक मुद्दे

Konkan Divisional Commissioner Annasaheb Misal