•   Thursday, August 28
मुंबई

माझ्याकडे बॉम्ब आहे! मुंबई एअरपोर्टवर महिला ओरडली, सगळ्यांना फुटला घाम; सत्य वाचून धक्का बसेल

मुंबई विमानतळावर महिलेच्या बॅगेत बॉम्ब असल्याची एकच अफवा सगळीकडे पसरली असून यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. विमानतळावर पोहोचल्यानंतर महिलेने माझ्या बॅगेत बॉम्ब असल्याचं सांगितलं. यामुळे पोलीस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली पण या घटनेमागचं नेमकं कारण समोर येताच सगळे हादरले.


पोलिसांच्या सांगण्यानुसार, आयपीसी कलम ३३६(इतरांची सुरक्षा धोक्यात येण्याची शक्यता असलेलं कृत्य करणं), ५०५-२ (व्यक्तींमध्ये द्वेष, वैर निर्माण होण्याची शक्यता असलेली विधानं करणं) या अंतर्गत महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर महिलेची चौकशी केली असता २९ मे रोजी संध्याकाळी रुची दीपक शर्मा या २९ वर्षीय महिला मुंबई विमानतळावरून कोलकात्याला जाणारी फ्लाइट पकडणार होत्या. त्यांनी स्पाइस जेट बुक केलं होतं. पण बोर्डिंग पास घेण्यासाठी त्या काउंटरवर पोहोचताच त्याच्याकडे एकूण २२.०५ किलो सामान असल्याचं सांगण्यात आले, तर नियमानुसार फक्त १५ किलोच सामान मोफत नेलं जाऊ शकतं.


यानुसार, महिलेकडे एकूण दोन बॅगा होत्या. सर्व सामान नेण्यासाठी त्यांना जादा पैसे द्यावे लागणार होते. पण यासाठी त्या तयार नव्हत्या. त्यामुळे स्पाइस जेटच्या कर्मचाऱ्यांशी त्यांची हाणामारीही झाली. मराठी नसलेल्या लोकांचा अशा प्रकारे छळ केला जातो, असा आरोप महिलेने केला असून यानंतर त्यांनी अचानक बॅगेत बॉम्ब असल्याची घोषणा केली. त्यानंतर लगेचच सीआयएसएफला घटनास्थळी पाचारण करण्यात आलं. तपासादरम्यान महिलेच्या बॅगेत काहीही संशयास्पद आढळलं नाही.