शाहरुख खान त्याची पत्नी गौरी आणि त्यांच्या तीन मुलांसोबत 'मन्नत' या मुंबईतील आलिशान बंगल्यात राहतो. समुद्रकिनारी असलेलं हे घर पर्यटकांसाठीही आकर्षणाचं केंद्र आहे. मन्नतच्या बाहेर फोटो काढण्यासाठी आणि शाहरुख खानची एक झलक पाहण्यासाठी चाहते तासनतास बंगल्याबाहेर उभे असतात. पण हे आलिशान घर बांधणं शाहरुखसाठी सोप्प काम नव्हतं. शाहरुख आणि गौरीने यासाठी खूप कष्ट सोसले आहेत. गौरीचं नुकतंच एक पुस्तक प्रकाशित झालं. 'माय लाइफ इन डिझाईन' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात शाहरुखने मन्नत बंगला कधी खरेदी केला आणि त्याचे घरामध्ये रूपांतर करण्यासाठी किती मेहनत घेतली याबद्दल खुलासा केला आहे.
शाहरुखने सांगितले की, जेव्हा त्याने पहिल्यांदा 'मन्नत' खरेदी केला होता, तेव्हा तो एवढ्या मोठ्या बंगल्यात राहण्यासाठी तयार नव्हता. तो म्हणाला, 'दिल्लीचा असल्याने बंगल्यात राहायची सवय होती. मुंबईत अपार्टमेंट्स आणखी महाग आहेत. मला या अपार्टमेंट्समध्ये राहायची सवय नव्हती. याचं कारण मी खूप श्रीमंत होतो म्हणून नाही, तर दिल्लीत प्रत्येकाकडे बंगला आहे म्हणून आम्हाला सवय नाहीछोट्या घरात राहण्याची सवय नव्हती.' शाहरुखने सांगितले की, त्याचे पहिले घर 'मन्नत'पासून फार दूर नव्हते आणि ते एका दिग्दर्शकाने त्याला दिले होते.
शाहरुख म्हणाला, 'आमच्याकडे जास्त पैसे नव्हते आणि काही पैसे मिळताच आम्ही सांगितले की आम्हाला हा बंगला विकत घ्यायचा आहे, पण ते आमच्या क्षमतेच्या पलीकडे होते. आम्ही ते विकत घेतले पण त्या घराची तेव्हा खूपच पडझड झालेली असल्याने आम्हाला ते पुन्हा बांधावे लागले होते. पण आमच्याकडे त्या घराच्या दुरुस्तीसाठी पैसे नव्हते. अर्थात, आम्ही एका डिझायनरला बोलावले. त्याने आम्हाला सांगितले की तो या घराला नवीन बांधून देईल पण त्याची फीस माझ्या एका महिन्याच्या पगारापेक्षा अधिक होती.
शाहरुखने सांगितले की, आम्ही डिझायनरची फी देऊ शकत नाही हे आम्हाला समजले होते आणि अशा प्रकारे 'मन्नत' हा गौरीचा डिझायनर म्हणून पहिला प्रोजेक्ट ठरला. घरातील त्याची आवडती जागा म्हणजे वाचनालय असल्याचेही त्याने सांगितले. शाहरुख म्हणाला की, मला माझी लायब्ररी सर्वात जास्त आवडते. घराचा हा भाग माझ्या ऑफिससारखा आहे. त्यात इलेक्ट्रॉनिक्स नाही. हे लायब्ररी आहे, मला त्यात बसायला आवडते. त्यातली पुस्तके वाचून खूप दिवस झाले आहेत, पण तिथे मन खूप रमतं.
गौरीच्या पुस्तकात 'मन्नत'च्या यापूर्वी कधीही न पाहिलेल्या अशा अनेक फोटोंचा समावेश आहे. त्याचबरोबर घर कसे आहे हेही शाहरुखने सांगितले. तो म्हणाला, 'आम्ही घरी जेवतो. आम्ही एकत्र जेवण करतो आणि त्या वेळी आम्ही सर्वांचा दिवस कसा गेला यावर चर्चा करतो. तसंच प्रत्येक ट्रिप वरून येताना गौरी घरामध्ये काहीतरी सजावटीची वस्तू आणायची. पै पै जमवून दोघांनी हे घर बांधलं आहे' असं त्याने सांगितलं. आज २७,००० स्क्वेअर फूट जागेत वसलेल्या शाहरुखच्या या घराची किंमत सुमारे २०० कोटी रुपये इतकी आहे. शाहरुखचा हा बंगला भारतातील सर्वात महागड्या बंगल्यांपैकी एक आहे.