आयपीएल नंतर आता महाराष्ट्र प्रीमियर लीगचे (एमपीएल) आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या फ्रँचाईजींचा लिलाव नुकताच पार पडला. या लिलावात सहा संघाच्या फँचाईजीसाठी तब्बल 57.80 कोटी रूपयांची बोली लागल्या. पुणे येथे झालेल्या लिलावात 20 इच्छुकांनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेतील सर्वात महागडी बोली पुणे फँचाईजीसाठी लागली.
यामध्ये सर्वाधिक बोली भारतीय संघातील मराठमोठा खेळाडू ऋतुराज गायकवाड करिता लागल्याचे दिसून आले. पुणे संघासाठी ऋतुराज गायकवाडवर संघमालक प्रवीण मसाले यांनी कोट्यवधींची बोली लावली.
महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल)
(संघमालक-फ्रेंचाइजी-बोली-आयकॉन)
प्रवीण मसाले - पुणे संघ - 14.8 कोटी रूपये - ऋतुराज गायकवाड
उद्योजक पुनीत बालन - कोल्हापूर संघ - 11 कोटी रूपये - केदार जाधव
ईगल इन्फ्रा - नाशिक संघ - 9.10 कोटी रूपये - राहुल त्रिपाठी
व्यंकटेश्वर - छत्रपती संभाजीनगर संघ - 8.70 कोटी रूपये - राजवर्धन हंगरगेकर
जेटसिंथेसिस इंडिया - रत्नागिरी संघ - 8.30 कोटी रूपये - अझीम काझी
कपिल सन्स - सोलापूर संघ - 7 कोटी रूपये - विकी ओस्तवाल