•   Thursday, August 28
क्रीडा

जय शाह यांनी दिले आशिया चषकासंबंधित मोठे अपडेट, BCCI देणार पाकिस्तानला झटका

आशिया चषक २०२३ कुठे खेळवला जाणार, याबाबत सातत्याने गोंधळ सुरू आहे. आशियाई क्रिकेट परिषदेकडून या वनडे स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मिळाले आहे. पण भारतीय संघ बराच काळ पाकिस्तानला गेलेला नाही. दोन्ही देशांमधील वादामुळे पुन्हा एकदा बीसीसीआयने पाकिस्तानला संघ पाठवण्यास नकार दिला आहे. अशा परिस्थितीत, पीसीबीने टूर्नामेंट २ ठिकाणी आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे, जेणेकरून टीम इंडिया विरुद्धचे सामने तटस्थ ठिकाणी आयोजित केले जातील. आशिया चषक २०२३ सप्टेंबरमध्ये होणार आहे. पण आता यावर जय शाह यांनी मोठे अपडेट दिले आहेत.


बीसीसीआयचे सचिव आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, "आशिया चषक स्पर्धेच्या ठिकाणाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. आम्ही सध्या आयपीएलमध्ये व्यस्त होतो, पण श्रीलंका क्रिकेट, बांगलादेश आणि अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे उच्चपदस्थ अधिकारी आयपीएलचा अंतिम सामना पाहण्यासाठी येत आहेत. आम्ही चर्चा करू आणि योग्य वेळी अंतिम निर्णय घेऊ." असे जय शाह यांनी पीटीआयला सांगितले.


यंदाच्या आशिया चषक स्पर्धेचे यजमान पाकिस्तानकडे आहे परंतु भारतीय क्रिकेट संघ केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय शेजारच्या देशात जाणार नाही, PCB चेअरमन नजम सेठी यांनी 'हायब्रीड मॉडेल' प्रस्तावित केले होते जेथे चार खेळ त्यांच्या देशात आयोजित केले जातील.


ACC च्या सूत्रांकडून असे कळले आहे की सेठी यांचे प्रस्तावित हायब्रीड मॉडेल ज्यामध्ये श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ आणि अफगाणिस्तान पाकिस्तानमध्ये चार प्राथमिक सामने खेळतील आणि भारत त्यांचे सर्व सामने तटस्थ ठिकाणी खेळतील, ACC ने कोणतीही औपचारिक विधान केली नसली तरी एक व्यवहार्य उपाय दिसतो. पीसीबीला भारत-पाकिस्तानचे हे दोन सामने दुबईत खेळवायला हवे असले तरी हे दोन सामने श्रीलंकेत होणार आहेत.


ळालेल्या माहितीनुसार, एसीसीचे प्रमुख जय शाह कार्यकारी मंडळाची बैठक बोलावतील, जिथे या संदर्भात अंतिम घोषणा केली जाईल. पीसीबीला भारताविरुद्ध तटस्थ ठिकाणी खेळण्यास कोणतीही अडचण नाही. आशिया कप १ ते १७ सप्टेंबर दरम्यान होणार आहे.