•   Thursday, August 28
क्रीडा

आयपीएल २०२३ चा हंगाम संपताच खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस; वाचा कुणाच्या खिश्यात किती झाले जमा

आयपीएल २०२३ चे जेतेपद चेन्नई ने पटकाविले आहे. आयपीएल २०२३ विजेता चेन्नई आणि उपविजेता गुजरात या दोन्ही संघांवर पैशांचा पाऊस पडला आहे. अंतिम सामन्यानंतर झालेल्या पुरस्कार सोहळ्यात खेळाडूंनीही विविध पुरस्कार पटकावले.


विजेत्या चेन्नई संघाला २० कोटी रुपये मिळाले असून उपविजेत्या गुजरातला १२.५० कोटी रुपये मिळाले आहेत. तर, गुजरातच्या शुभमन गिलला ऑरेंज कॅप आणि शामीने पर्पल रंगाची कॅप जिंकली आहे.


विजेता संघ (चेन्नई) – २० कोटी रुपये, उपविजेता संघ (गुजरात) – १२.५० कोटी रुपये, तिसऱ्या क्रमांकाचा संघ (मुंबई) – ७ कोटी रुपये, चौथ्या क्रमांकाचा संघ (लखनऊ)- ६.५ कोटी रुपये मिळाले आहे. 

याशिवाय या खेळाडूंचीही १० लाख रुपयांची घसघशीत कमाई


हंगामात सर्वांत जास्त बळी (पर्पल कॅप) – मोहम्मद शामी २८ बळी

हंगामातील सर्वांत जास्त धावा (ऑरेंज कॅप)- शुभमन गिल ८९० धावा

हंगामातील उदयोन्मुख खेळाडू – यशस्वी जयस्वाल


हंगामातील सर्वांत जास्त षटकार –


इलेक्ट्रिक स्ट्रायकर ऑफ द सिझन – ग्लेन मॅक्सवेल

गेमचेंजर ऑफ द सिझन – शुभमन गिल

पेटेएम फ्लेअर प्ले अवॉर्ड – दिल्ली कॅपिटल्स

हंगामातील सर्वोत्कृष्ट झेल – राशिद खान

हंगामातील सर्वाधिक मौल्यवान खेळाडू – शुभमन गिल

रुपे ऑन द गो ४एस ऑफ द सिझन – शुभमन गिल

सर्वांत लांबलचक षटकार – फाफ डु प्लेसिस

खेळपट्टी आणि मैदान पुरस्कार – वानखेडे स्टेडियम आणि ईडन गार्डन (५० लाख रुपये)


अंतिम सामन्यातील पुरस्कार्थी


इलेक्ट्रिक स्ट्रायकर ऑफ द मॅच- अजिंक्य राहाणे

सामना पलटवणारा खेळाडू – साई सुदर्शन

सर्वांत मौल्यवान खेळाडू – साई सुदर्शन

लांबलचक षटकार खेचणारा खेळाडू- साई सुदर्शन

सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू – डेलोन कॉन्वे

सामन्यातील सर्वोत्कृष्ट झेल – एमएस धोनी


आयपीएल २०२३ मधील सर्वाधिक धावा करणारे खेळाडू


शुभमन गिल, गुजरात – ८९०

फाफ डू प्लेसिस, बेंगळुरू- ७३०

डेवोन कॉन्वे, चेन्नई – ६७२

विराट कोहली, बेंगळुरू – ६३९

यशस्वी जयस्वाल, राजस्थान – ६२५


आयपीएल २०२३मधील सर्वाधिक बळी घेणारे खेळाडू


मोहम्मद शमी, गुजरात- २८

मोहित शर्मा, गुजरात – २७

राशिद खान, गुजरात- २७

पियुष चावला, मुंबई- २२

युजवेंद्र चहल, राजस्थान – २१