•   Wednesday, October 29
वाणिज्य

गेल्या वर्षभरात सरकारी बॅंकांमध्ये 1.48 लाख कोटींचा घोटाळा, RTIमध्ये खुलासा

मुंबई- Fraud in banks माहितीच्या अधिकाराद्वारे विचारलेल्या प्रश्नावर भारतीय रिझर्व बॅंकेने सांगितले आहे की, एप्रिल, 2019 ते 31 मार्च 2020 या काळात सरकारी बॅंकांमध्ये 1.48 लाख कोटींचा घोटाळा झाला आहे.

Fraud in public sector banks प्रश्नावर भारतीय रिझर्व बॅंकेने सांगितले आहे की मागील आर्थिक वर्ष 2019-20मध्ये सरकारी क्षेत्रातील 18 बॅंकांमध्ये एकूण 1,48,427.65 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे 12,461 प्रकार समोर आले आहेत. मध्यप्रदेशातील नीमच येथील रहिवासी असलेले माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रशेखर गौड यांनी गुरुवारी सांगितले की रिझर्व बॅंकेने आरटीआय अंतर्गत त्यांना ही माहिती दिली आहे. आरटीआयमधून समोर आलेल्या आकड्यांवर लक्ष दिले असता मागील आर्थिक वर्षात सरकारी क्षेत्रातील सर्वात मोठी असलेली भारतीय स्टेट बॅंक (एसबीआय) मध्ये सर्वाधिक घोटाळे झाले आहेत. यादरम्यान एसबीआयने 44,612.93 कोटी रुपयांच्या घोटाळ्यांसंबंधीच्या 6,964 घटनांची माहिती दिली आहे. ही रक्कम मागील आर्थिक वर्षात 18 सरकारी बॅंकांमधील घोटाळ्यातील एकूण रकमेच्या जवळपास 30 टक्के आहे.

RBIने माहिती अधिकारांतर्गत सांगितले की पंजाब नॅशनल बॅंकेकडून एप्रिल, 2019 ते 31 मार्च 2020 या काळात 295 घोटाळ्यांची माहिती दिली. ज्यात 15,354 कोटी रुपयांची रक्कम आहे. या यादीत तिसऱ्या स्थानी बॅंक ऑफ बडोदा आहे ज्यामध्ये 349 प्रकारांमध्ये 12,586.68 कोटी रुपयांचा घोटाळा समोर आला आहे. हे लक्षात घ्यायला हवे की बॅंक ऑफ बडोदामध्ये विजया बॅंक आणि देना बॅंकेचे विलीनीकरण एप्रिल, 2019मध्ये झाले आहे.

1 एप्रिल, 2019 ते 31 मार्च, 2020 या काळात बॅंकांमधील घोटाळे

1.      एसबीआयमध्ये 44,612.93 कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या 6,964 घटनांची माहिती दिली गेली आहे

2.      पंजाब नॅशनल बॅंकेत 15,354 कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या 395 घटनांची माहिती दिली गेली आहे

3.      बॅंक ऑफ बडोदामध्ये 12,586.68 कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या 349 घटनांची माहिती दिली गेली आहे

4.      यूनियन बॅंक ऑफ इंडियात 424 घटनांमध्ये 9,316.80 कोटी रुपये

5.      बॅंक ऑफ इंडियात 200 घटनांमध्ये 8,069.14 कोटी रुपये

6.      कॅनरा बॅंकेकडून 208 घटनांमध्ये 7,519.30 कोटी रुपये

7.      इंडियन ओवरसीज बॅंकेकडून 207 घटनांमध्ये 7,275.48 कोटी रुपये

8.      अलाहाबाद बॅंकेकडून 896 घटनांमध्ये 6,973.90 कोटी रुपये

9.      यूको बॅंकेकडून 119 घटनांमध्ये 5,384.53 कोटी रुपये

10.  ओरिएंटल बॅंक ऑफ कॉमर्सकडून 329 घटनांमध्ये 5,340.87 कोटी रुपये

11.  सिंडिकेट बैंकेकडून 438 घटनांमध्ये 4,999.03 कोटी रुपये

12.  कॉर्पोरेशन बॅंकेकडून 125 घटनांमध्ये 4,816.60 कोटी रुपये

13.  सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाकडून 900 घटनांमध्ये 3,993.82 कोटी रुपये

14.  आंध्रा बॅंकेकडून 115 घटनांमध्ये 3,462.32 कोटी रुपये

15.  बॅंक ऑफ महाराष्ट्रमध्ये 413 घटनांमध्ये 3,391.13 कोटी रुपये

16.  यूनाइटेड बॅंक ऑफ इंडियात 87 घटनांमध्ये 2,679.72 कोटी रुपये

17.  इंडियन बॅंकेकडून 225 घटनांमध्ये 2,254.11 कोटी रुपये

18.  पंजाब अॅंड सिंध बॅंकेकडून 67 घटनांमध्ये 397.28 कोटी रुपये

इतक्या रकमेच्या घोटाळ्यांची माहिती मागील आर्थिक वर्षात 18 सरकारी क्षेत्रातील बॅंकांनी दिली आहे.

दरम्यान रिझर्व बॅंकेने आरटीआयअंतर्गत दिलेल्या या माहितीत बॅंकांमधील या घोटाळ्यांची पध्दत किंवा यातील 18 सरकारी बॅंकांना किंवा ग्राहकांना झालेल्या नुकसानाची काहीही माहिती दिलेली नाही. गेल्यावर्षी झालेल्या विलीनीकरणानंतर देशात सरकारी क्षेत्रांमधील बॅंकांची संख्या बारा इतकी झाली आहे.

बातमीतील ठळक मुद्दे

Fraud Fraud in public sector Bank RBI RTI SBI