•   Thursday, August 28

मुलगी होणं सोप्पी नसतं हो... पुष्कर लाभे, नागपूर

मी मनिषा, मुळची हाथरस या गावाची.... ६०० घरांचं माझं गाव... दिल्लीपासून दोनशे किलोमिटर अंतरावर असलेल्या गावात आई, भावासोबत गुण्यागोविंदानं राहत होती... गावात अर्धी घरं ठाकुरांची, १०० घरे ब्राह्माणांची आम्हा दलितांची बोटावर मोजण्याइतकीच घरं... शेतात आई भावासोबत जायचं काम करायचं हा माझा नित्यक्रम... निसर्गाच्या सानिध्यात खेळायला बागडायला लहानपणापासूनच शिकले होते.... शेतात काम करतानाच मी यौवनात प्रवेश केला... मी अवघ्या १९ वर्षात पदार्पण केले होते हो..... आयुष्य जगण्याचा पल्ला बराच लांब होता... पण नियतीचा काही औरच हवे होते... यात इतर मुलींना जसा त्रास होतो ना... तसा त्रास मलापण व्हायचा... मी त्याकडे कधी लक्ष दिले नाही... माझं इथेच चुकलं... त्याकडे जास्त गांभीर्याने लक्ष द्यायला हवे होते... ठाकुर – दलित वाद पाचवीलाच पुजलेला...आमच्या घरातही तेच होते... घराशी खानदानी दुश्मनी असलेल्या वादानेच माझा घात केला... 

१४ सप्टेंबरला मी नेहमी प्रमाणे आई बरोबर शेतात कामाला निघाले होते... आई भाऊ गवताचा भारा कापत होते... मी आईच्या पाठी बसले होते.. तितक्यात ते चार नराधम आले.... गळ्यात ओढणी टाकून फरफटत नेलं हो त्यांनी मला. शेजारच्या बाजरीच्या शेतात आणि केला त्यांनी माझ्या नाजुक देहाचा चुराडा.... त्या चार नराधमांनी दिलेल्या यातनांनी तना मनावर अगणित जखमा झाल्या... माझ्या पाठीचा कणाच अक्षरशः मोडून गेला... मी कुठेही बोलू नये म्हणून माझी जीभ कापून टाकली.... साध खरचटलं तरी अंगाची जळजळ होते.. सहन होत नाही... जरा विचार करा... माझे काय हाल झाले असतील...    

शेजारच्या शेतामध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेला माझा देह बघून माझ्या माउलीची अवस्था काय झाली असेल याचा विचार देखील आता करवत नाही... माझं रक्तबंबाळ शरीर ओढणीने झाकलं... ऍम्ब्युलन्समधून मला सुरूवातीला जिल्हा रूग्णालयात भरती केलं.... तिथं प्राथमिक निदान करण्यात आलं.. त्यानंतर मला अलीगढच्या रूग्णालयात भरती केलं... माझा जीवन मरणाशी संघर्ष सुरू होता... अगदी कालपर्यंत मी हरायला तयार नव्हते... पण तिन्ही इस्पितळांनी केलेला संघर्ष व्यर्थ ठरला... माझी झुंज अपयशी ठरली... 

माझा जीवनप्रवास संपला... माझ्या कुटुंबाला विश्वासात न घेता केलेल्या अंत्यसंस्काराचा फोटा बघाचं... तो साधा फोटा नव्हता... माझ्यासारख्या मुलींना संपविण्याचा विकृत कट होता... मुलगी होणं इतकं सोप्प नसतं हो... सोप्पी नसतं...  

माझ्यावर अत्याचार झाल्याची बातमी देशभरात वाऱ्यासारखी पसरली. सर्वत्र विरोध होऊ लागला... सोशल मीडियावर हॅशटॅग ट्रेंडिग होऊ लागले... आता माझ्यावर अत्याचार केलेल्या नराधमांना शिक्षा होईलच... परंतु, मुलीनों! उद्या तुमच्यावर जर हा प्रसंग आला तर दोन हात करायला शिका... आपल्या दुबळेपणाचा गैरफायदा घेतात इथले लोकं.... 

मला माहितीये उद्यापासून तुमचं जीवन रूटिन सुरू होईल... कदाचित मी तुम्हाला लक्षात राहणार नाही... स्त्री सक्षमीकरणाची कास धरू बघणाऱ्या देशात महिला केवळ भोगापुरत्या मर्यादित न ठेवता तिच्यातील स्व अस्तित्वाची जाणीव प्रत्येकाच्या मनात असू द्या... स्त्रीयांना केवळ भोगापुरतं मर्यादित न ठेवता त्यांना एक व्यक्ती म्हणून जगण्याचा अधिकार दिला तर राष्ट्र संपन्न होईल... खऱ्या अर्थाने बेटी बचाव, बेटी पढाव चळवळ पूर्णत्वास जाईल. 

तुमची 

मनिषा