•   Thursday, August 28

त्या दिवशी तिने केसात फुल गुंफले नव्हते. सर्व देश भ्रमातच... पुष्कर लाभे , नागपूर

दुरदर्शन हे त्या काळी एकमेव प्रभावी माध्यम म्हणून नुकतच उदयास आले होते. देशभरातील घडमोडी जाणून घेण्यासाठी देशातील नागरिकांना दुरदर्शनवरच अवलंबून राहावे लागत. ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी तसेच काही खास होते. सलमा सुल्तान दुरदर्शनवरील प्रभावी निवेदिका होती. सरळ मध्यम बांधा, लांब काळेभोर केस, केसांमध्ये गुलाब, कानात पठाणी झुमके हा तिचा देखणा रूबाब बातम्यामधील रोचकता वाढवायचा.

त्या दिवशी तिला संध्याकाळी ७.३० चे बुलेटिन वाचायचे होते. परंतु, बातमी हातात आल्यानंतर १७ वर्षांपासून कणखरपणे बातम्यांना प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहचविणारी सलमा त्या दिवशी कंपित झाली होती. देशात अराजकता आणि हिंसा माजवणारी ही बातमी होती. बातमी होती पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या. तिला संपादकाचे आदेश आले की, या बातमीला नेहमीप्रमाणे संयमी स्वरूपात दे. कारण, ही बातमी तिला ब्रेक करायची होती. तिच्या डोळ्यांच्या कडा पाणवल्या. त्याच परिस्थितीत कॅमेरा समोर आला आणि बुलेटिन सुरू झाले.

 "आज सवेरे नई दिल्ली में, प्रधानमंत्री के निवास स्थान पर श्रीमती गांधी की हत्या करने की ‘कोशिश’ की गई, उन्हें तुरंत ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ़ मेडिकल साइंसेज ले जाया गया. वहां पहुंचते ही डॉक्टरों ने उनका उपचार शुरू कर दिया है."

तिने ती बातमी वाचली. अगदी स्थीर व स्थितप्रज्ञ असलेली सलमा त्यावेळी घाबरून आणि गोंधळून गेली होती. विशेष म्हणजे त्या दिवशी तिचा नकाब (चेहरा) ही देशवासियांना काहीतरी अराजकतेचा इशारा देत होता. तिने त्या दिवशी केसात गुलाब गुंफला नव्हता. कानातील झुमकेही दिसत नव्हते. सर्व देशाला बातमी त्यावेळीच कळून चुकली होती. काही तरी अघटित आज घडले आहे.