Thursday, August 28
- 5.9
C
विदेश
देश
महाराष्ट्र
मुंबई
पश्चिम महाराष्ट्र
मराठवाडा
कोकण
उत्तर महाराष्ट्र
विदर्भ
वाणिज्य
तंत्रज्ञान
मनोरंजन
क्रीडा
लाईफस्टाईल
ब्लॉग
विदेश
देश
महाराष्ट्र
मुंबई
पश्चिम महाराष्ट्र
मराठवाडा
कोकण
उत्तर महाराष्ट्र
विदर्भ
वाणिज्य
तंत्रज्ञान
मनोरंजन
क्रीडा
लाईफस्टाईल
ब्लॉग
Home
Blogs
paralysis-attack---experience-and-message
बाबांचा पॅरेलेसिस अटॅक - अनुभव आणि संदेश
डॉ. ध्रुव सुरेशचंद्र बत्रा, नागपूर
एरव्ही सकाळी 5 वाजता उठणारे बाबा तब्बल 7 वाजेपर्यंत बेडवर गाढ झोपेत दिसत होते. दोन-तीनदा हाक देऊनही काहीच प्रतिक्रिया दिसली नाही तेंव्हा त्यांना हळूच हालविले. आता मात्र बाबांनी डावा हात हलविला. त्यांचं तोंड किंचित वाकडं झाल्यासारखे वाटत होते. ते माझ्याकडे असहायपणे बघत होते. माझे बोललेले त्यांना कळत होते पण तोंडावाटे शब्दच निघत नव्हता. उजवा हात आणि पाय अजिबात हालत नव्हता. ‘पॅरेलेसिस अॅटैक’! क्षणार्धात आठवले, हृदयात धडकीच भरली. त्याबद्दल ऐकलं होतं, बघितलं पण होत पण खूद्द आपल्याकडे हे असे होईल हे ध्यानी मनी पण नव्हते.
बाबा पूर्ण शुध्दीवर होते, पण त्यांच्या उदास चेहऱ्याकडे बघून नजर भिडवायची हिम्मत होत नव्हती. स्मृति पटलावर चित्रांची मालिका सुरु झाली. 5 वर्षांपूर्वी बाबांनी सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यावर स्वतःला सामाजिक कार्यात वाहून टाकले होते. ब्लड प्रेशर, मधुमेहचे मागच्या काही वर्षांपासून निदान झाल्यानंतर ते औशधोपचार नियमितच घ्यायचे. व्यायामाची विशेष आवड नसली तरी त्यांचे पायी फिरणे बरेच व्हायचे. त्यांना धुम्रपानाची सवय नव्हती. शेजारच्या दत्तू काकांना मागील वर्षी पॅरेलेसिस व्हायच्या आधी बरेच वेळा बाबा त्यांना सिगारेट बंद करायलाही सांगत असत.
‘काय कारण असेल बाबांना पॅरेलेसिस होण्याचं’ हा विचार करीत असताना आठवले की कोविडच्या साथीमुळे मागील काही महिन्यापासून रेग्यूलर चेकअपसाठी बाबा त्यांच्या डॉक्टरकडे जाऊ शकले नाही. बीपी, शुगरच्या तपासण्यापण झाल्या नाही. औषध जुनेच ते नेहमीप्रमाणे घेत असतील असा आमचा अंदाज. शेजारच्या दत्तू काकांचे चित्र स्मृति पटलावर उभे राहले. मागील वर्शापासून पॅरेलेसिसमुळे दत्तू काका ना बोलू शकतात ना उभे राहू शकतात. संपूर्ण घर कसे हादरुन गेले आहे त्यांच्या पॅरेलेसिसच्या अटॅकमुळे आलेल्या शारीरिक, मानसिक, आर्थिक बोझामुळे. हे पण आठवले की दत्तू काका पॅरेलेसिस झालेल्या दिवशी तब्बल दिवसभर घरीच होते. ॲडमिट झाल्यावर डॉक्टर घरच्यांना म्हणाले पण होते की तुम्ही बराच उशीर केला आणायला. अजून आठवले, एका चॅनलवर मुलाखती दरम्यान ऐकलेले की Be Fast. पॅरेलेसिसच्या धोक्याची लक्षणे Balance, Eyes Face, Arms, Speech, Time. पहिल्या पाच मधील अचानक उद्भवलेला अशक्तपणा, आणि वेळेला, प्रत्येक सेकंदाला किंमत आहे असा त्याचा अर्थ. वेळेवर योग्य ठिकाणी योग्य उपचार झाल्यास पॅरेलेसिस बरा पण होऊ शकतो, हे ऐकलेले आठवले.
लागलीच फॅमिली डॉक्टर कुळकर्णींना फोन लावला. स्वतः कोविडमुळे क्वारेन्टाईन असल्यामुळे त्यांनी व्हिझीट बद्दल दिलगिरी व्यक्त केली. त्यांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या की बाबांना तोंडावाटे काही देऊ नका, एका कडेवर ठेवा आणि त्यांनी स्वतः ॲम्बुलन्सला फोन करुन बाबांना सर्व सोयींनी सुसज्ज, विशेषत: C.T. Scan असलेल्या हॉस्पीटलमध्ये भरती करण्याची व तिथल्या डॉक्टरांना पूर्व सूचना देण्याची व्यवस्था लागलीच केली. अर्ध्या तासातच आम्ही बाबांना घेऊन हॉस्पीटल मध्ये दाखल झालो. पूर्वसूचना दिल्यामुळे न्युरोलॉजिस्ट डॉ विवेक तिथे हजर होते. त्यांनी तपासणी करुन बाबांना लागलीच सी. टी. स्कॅनसाठी हलविले
तासाभराने डॉ. विवेकनी आम्हाला त्यांच्या खोलीत बोलावून मेंदूतील रक्तवाहिनीत मोठा क्लॉट असल्याचे सी.टी.स्कॅन मध्ये दाखविले. त्वरित उपचाराने तो विरघळेल व रिकवरी होण्यास मदत मिळेल, असे पण सांगितले. वेळेवर पोहचल्यामुळे हे शक्य आहे. आपल्या देशात दररोज जवळपास 5000 लोकांना पॅरेलेसिसचा अटॅक येतो, त्यातील काही भाग्यवानच हॉस्पीटलमध्ये वेळेवर पोहोचतात, असे पण ते म्हणाले. त्यांचे अचूक निदान, आत्मविष्वास, रुग्णाबद्दलची आस्था व आमच्याषी व्यक्त झालेली संवेदना एकूण भारावून टाकणारी होती. हॉस्पीटलचे एकूण वातावरण पण दिलासा देणारे असेच होते.
मी काऊंटरवर औपचारिकता पूर्ण करावयास गेलो. बाबांच्या वैद्यकीय विम्याची माहिती माझ्या मोबाईलमध्येच असल्यामुळे काहीच अडचण आली नाही. एवढयात बाबांना ICCU मध्ये नेण्यात आले. जातांना बाबा पूर्ण शुध्दीवर होते. आम्ही त्यांना टाटा केल्यावर त्यांनी डावा हाथ हलवून संथ प्रतिसाद दिला. पण त्यांचे मौन बरेच काही बोलत होते.
डॉ. .विवेक ICCU मध्ये प्रवेश करते झाले. जातांना आमच्याजवळ येऊन थांबून म्हणाले की बाबांचे ब्लडप्रेशर तसेच शुगर वाढलेले आहे. फॅमिली डॉक्टर कुळकर्णींशी माझे बोलणे झाले आहे व त्यांनी बाबांना असणाऱ्या पोटाच्या त्रासाची व काही औषधीच्या अॅलर्जीबद्दल मला कळविले आहे. त्यानुसार काळजी घेऊन आम्ही सलाईनमधून विशेष औषधीद्वारे मेंदूतील क्लॉट विरघळणाऱ्या उपचाराला सुरुवात करतो आहे. डॉक्टरांचा प्रचंड आत्मविष्वास आम्हाला संजीवनीच होता.
रात्रभर बाबा ICCU मध्येच असल्यामुळे आम्हाला तिथे प्रवेश नव्हता. पण सिस्टर आणि रेसिडेंट डॉक्टर वरचेवर येऊन आमच्याशी संवाद साधत होते. रात्रभर माझ्या मनात विचारांचे थैमान सुरु होते. बाबांचे नियमित चेकअप न झाल्यामुळे वाढलेल्या ब्लडप्रेशर व शुगरमुळे गिल्टी फीलींग येत होती. आईनी रात्री घरी गेल्यावर बघितले की बाबांच्या कपाटातील औषधी पण संपुश्टात आल्या होत्या. बाबा औषधे घेतल्या नंतर कॅलेंडरवर मार्क करायचे, दिसून आले की मागील दोन दिवसापासून कॅलेंडरवर मार्किंग पण नव्हती. रात्रभर आत्मवंचनेचा भाव प्रखरपणे जाणवत होता.
कशीबशी पहाट उजळली. घरी जाऊन तयार होऊन परत येइस्तोवर दहा वाजले. डॉ. विवेक यांचा ICCU मध्ये राऊंड सुरु होता. मी व आई बाहेर त्यांची वाट बघत होतो. आम्ही आज बाबांना भेटलो नव्हतोच. ‘‘सुधीर, Congratulations. Your father get back his speech, he can talk now, उजवा हाथ व पाय देखील बऱ्यापैकी move होत आहे. It worked. माझ्या आनंदाला सीमाच नव्हती. आईच्या डोळयावाटे अश्रू झळकत होते. डाॅक्टरांना प्रणाम करताच त्यांनी माझ्या खांद्यावर हाथ ठेवला आणि माझी पाठ थोपटत ते म्हणाले. ‘‘You have done it. You brought him in time. आता मला समाधान वाटत होते.
मी व आई ICCU मध्ये गेलो. आष्चर्य! बाबा उजव्या हातानी जूस पीत होते. आम्हाला बघताच ‘या’ म्हणाले. त्या एका षब्दाने आम्हाला किती धीर आला व आनंद लाभला हे षब्दानी व्यक्त करु षकत नाही.
होता होता अजून तीन दिवस उलटली. एव्हाना बाबांना बेडवरुन उतरवून उभे करण्यात पण आले होते. परवा पासून ते उजवा पाऊल पण पुढे टाकत पण चालतांना त्यांना आधाराची गरज होती. त्यांचे बोलणे बरेचसे पूर्ववत आले होते, एखादा षब्द मधेच अडखळायचा तेवढाच काय तो.
आज बाबांना अॅडमिट होऊन पाच दिवस झालेले. कालच डॉ. विवेकनी बाबांना उद्या डिस्चार्ज करु असे सूचित केले होते व आम्हाला सकाळीच यायला सांगितले होते. ठरल्यानुसार बाबांचे डिस्चार्ज कार्ड वगैरे तयार असून हॉस्पीटल तर्फे सर्व औपचारिकता पूर्ण झालेली होती.
खोलीत षिरताच बाबा खुर्चीत बसून दोन्ही हातात वर्तमानपत्र धरुन वाचत असल्याचे आम्हाला आढळले. इतक्यात डॉ. .विवेक बाबांना भेटण्यास रुममध्ये आले आणि नवलच, बाबांनी डॉक्टरांशी उजव्या हातानेच कडक handshake पण केले. दोघेही मनसोक्त हसत होते. आता डाॅक्टर आम्हा सगळयांना उद्देशून म्हणाले, ही रिकवरी योग्य उपचार वेळेवर मिळाल्यामळेुच शक्य झाली त्यामुळे तुम्हा सगळयांचे अभिनंदन. काही दिवसासाठी मी फिजिओथेरॉपीस्टला बॅलॅन्स ट्रेनिंगसाठी घरी पाठवीन. लक्षात ठेवा, रुग्णाचा नियमित फॉलोअप, नियमित तपासण्या आणि नियमित उपचार हे तिन्ही महत्त्वाचे आहे. आणि बरेचदा या वयात रुग्णाला स्मृतिभ्रंश पण असतो त्यामुळे औषधे घेण्याचे ते विसरतात म्हणून घरच्या मंडळींनी ती जबाबदारी घेणे आवश्यक आहे . लक्षात ठेवा Precaution is better than cure.
डॉक्टरांचा, नर्सिंग स्टाफ व इतर कर्मचारी या सर्वांचे आभार व्यक्त करीत आम्ही समाधानाने हॉस्पीटलमधून निरोप घेतला.
(29 ऑक्टोबर ‘‘वर्ल्ड स्ट्रोक डे’’ जागतिक पक्षाघात दिनाच्या निमित्ताने.)